बदलापूर जांभूळ शोकांतिकेकडून यशोगाथे कडे वाटचाल!

बदलापूर जांभूळ भौगोलिक मानांकन हा विषयच बदलापूरकरांसाठी नवीन होता. युरोप मध्ये ५९००० भौगोलिक मानांकन आहेत पण भारतात केवळ १२० आहेत हि गोष्ट एका तरुण बदलापूरकराच्या लक्षात आली. आपण जिथे राहिलो लहानाचे मोठे झालो त्या गावातील अवीट गोडीचे मधुर चवीचे जांभूळ हे फळ हे भौगोलिक मानांकन मिळण्यास लायक आहे हा विश्वास या मुलाच्या मनात होता. पण गरज होती प्रशासकीय, तांत्रिक, आर्थिक, कौटुंबिक पाठबळाची पण हार नही मानूंगा रार नही ठानुगा या उक्ती प्रमाणे हा तरुण झपाटल्यासारखं काम करू लागला मागच्या आठ महिन्यात कृषी विभागाला सुमारे ४५ वेळा, जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन इथे १५-२० वेळा, पुणे, दिल्ली, मुंबई अशा असंख्य खेपा आणि कमीत कमी च्या वर फोन करून दोन वर्षाचे काम ८ महिन्यात पूर्ण केले. या मुलाचे नाव आदित्य अरविंद गोळे. दिनांक १८ एप्रिल च्या मिटींग मध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी आदित्य गोळे यांचा उल्लेख करून जाहीरपणे सांगितले कि आदित्य यांचा हेतू साफ आहे हे त्यांच्या वागण्यात बोलण्यात दिसत होतं नाहीतर सहज ६ महिने रखडलेल्या अवस्थेत ठेवले असते पण बदलापूर जांभुळाची चव आणि आदित्य गोळे चे सच्चे प्रयत्न यामुळे आम्ही त्यांच्या कामाला सहकार्य केले.

बदलापूर आणि परिसरातील २० गावांचा सर्वे देखील आदित्य गोळे यांना करावा लागला. अनेक वेळा विनंती करून देखील कृषी विभागाकडे माहिती उपलब्ध नव्हती आज करू उद्या करू अशी उत्तरे मिळत होती त्यामुळे सरकारी यंत्रणेवर अवलंबून राहण्यात अर्थ नाही हे लक्ष्यात आल्याव्वर स्वतः २० गावातील मग

  • राहाटोळी,
  • एरंझाड,
  • बदलापूर गाव,
  • पाचोन,
  • पादीर पाडा,
  • बोराडपाडा,
  • बारवी डॅम

परिसर इत्यादी सुमारे २० गावे हिंडून सुमारे १२०० झाडे शोधून अंदाजित डाटा तयार केला .

बदलापूर जांभूळ आता इतिहास रचेल यात शंका नाही!

हे सर्व काम स्वतःच्या खर्चाने सुरु होते. पण मानांकनाची केस लढण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी स्वतः दखल घ्यावी अशी विनंती श्री आदित्य गोळे यांनी केली. तुमची जांभळे आम्ही खाल्ली आहेत आणि त्याचे संवर्धन करत आहात तर आम्ही तुमच्या सोबत आहोत असे जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितले पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदेश दिले कि गोळे च्या कामाची तपासणी करून उचित कार्यवाही करा. या कमी श्री. वामन म्हात्रे यांनी मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. कथोरे साहेबांनी देखील जिल्हा नियोजन अधिकारी यांना दखल घेण्याची विनंती केली. हे सर्व प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री महोदय श्री कपिल पाटील यांच्या लक्षात आणून देणे गरजेचे होते कारण यात गावाचे हित आहे ठाणे जिल्ह्याचा मान वाढणार आहे. त्यामुळे सन्माननीय पाटील साहेबांना पत्राद्वारे कळविले आणि त्यांच्या कार्यालयाने त्वरित सकारात्मक प्रतिसाद दिला. आता सगळं जुळून येत असेल तर केस दाखल करायचीच या इराद्याने श्री. हिंगमिरे या वकिलांना पाचारण करायचे हा निर्णय गोळे यांनी घेतला. हिंगमिरे जी हे लंडन मधून भारतात आलेले कार्डिफ युनिव्हर्सिटी चे वकील. दोन वेळ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले. आदित्य गोळे यांचे दिल्ली येथील संपर्क या वेळी कामी आले. त्यांच्या विनंतीला मान देऊन श्री. हिंगमिरे यांनी बदलापूर जांभळाची केस स्वीकारली आणि पहिले प्रेझेंटेशन १८ एप्रिल २०२२ ला जिल्हाधिकारी ठाणे यांच्या कार्यालयात झाले. सुमारे २ तास असे मॅरेथॉन सादरीकरण झाले. आता निर्णायक टप्यावर केस आली असून शास्त्र शुद्ध सर्वेक्षण आणि ऐतिहासिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.

श्री अरविंद गोळे, श्री अजिंक्य गोळे, श्री धनंजय गोळे, श्री आशिष गोळे हे देखील या कामात सहभागी आहेत. श्री मोहन जोशी इनामदार यांनी देखील मदतीचे आश्वासन दिले आहे . कृषी विभागातील श्री माने साहेब, सौ .गावंड मॅडम तसेच जिल्हा नियोजन समितीच्या पाटील मॅडम आणि जिल्हा नियोजन अधिकारी श्री जाधव साहेब हे श्री आदित्य गोळे यांना प्रशासकीय आणि तांत्रिक सहाय्य करत आहेत.

या कामासाठी निधीची गरज भासणार असून पर्यावरण प्रेमी, जांभूळ प्रेमी यांनी सढळ हस्ते आर्थिक, सामाजिक मदत करण्याचे आव्हानही या निमित्ताने करत आहोत. या कामासाठी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत ट्रस्ट स्थापन केला आहे. बदलापूर जांभूळ परीसंवर्धन नावाचा ट्रस्ट आहे तरी सर्वानी दखल घेऊन उचित सहाय्य करावे अशी विनंती

null

आशिष गोळे

समाजसेवक

हे समाजसेवक आहेत. निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व म्हणून परिसरात परिचित आहेत. यांनी स्वतः शेकडो झाडे लावून जगवली आहेत. बदलापूर जांभूळ संवर्धनासाठी त्यांनी आता निश्चय केला आहे.

null

अरविंद गोळे

निवृत्त सरकारी कर्मचारी

बदलापूर जांभूळ या फळाची त्यांना विशेष आवड आहे. मागील वीस ते बावीस वर्षे सिझन ला जांभळाची खरेदी करून आपल्या नातेवाईकांना भेट म्हणून देण्याची त्यांना आवड आहे. आदिवासी भागातील व्यावसायिकांना हातात चार पैसे मिळावेत आणि नातेवाईकांना चांगला रानमेवा मिळावा या हेतूने अरविंद जी नि:स्वार्थी पणे हे काम करत आहेत. भावी पिढ्यांना बदलापूर जांभूळ खाता यावे यासाठी आताच प्रयत्न केले पाहिजेत या भूमिकेतून अरविंद जी या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत

null

धनंजय गोळे

बियाणे व्यावसायिक

हे गेली काही वर्षे खते आणि बियाणे या व्यवसायात होते. बदलापूर जांभळाची झाडे परिसरात कुठे मिळतात याची पाहणी करण्यात यांनी पुढाकार घेतला आहे. बहु वार्षिक झाडांचे संवर्धन करण्याचा यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे.